• Mon. Aug 18th, 2025

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

Byjantaadmin

Aug 18, 2023

तुम्हाला फिरण्याची आवड आहे? राज्यातील पर्यटन व्यवसायाविषयी थोडीफार माहिती आहे का? मग बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती (MTDC Bharti 2023) सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

एमटीडीसी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा (MTDC Jobs Vacancy) भरल्या जाणार आहेत. येथे दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरी मिळणार आहे. सहाय्यक अधिक्षक (गट-क) चे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी पूर्ण केलेली असावी.ज्युनिअर इंजिनीअर ग्रुप सीचे 1 पद भरले जाणार असून यासाठी इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. जतन सहायक (गट-क) च्या 2 जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असावा. तंत्र सहायक (गट-क) ची 6 पदे भरली जाणार असून यासाठी उमेदवाराकडे प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी असावी.मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) च्या एका पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उप आवेक्षक (गट-क) च्या 6 पदांसाठी उमेदवाराकडे दहावी सोबतच बिल्डिंग सुपरव्हिजनचा कोर्स केलेला असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *