स्वच्छतेसाठी महाश्रमदान ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
व्यंकटेश आय हॉस्पिटल,जटाळ हॉस्पिटल, मुक्ताई मंगल कार्यालय, पडिले कॉम्प्लेक्स समोरील, अंबाजोगाई रस्ता वरील दुभाजकाची ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी स्वच्छता केली.या मध्ये दीड ट्रेकटर गवत, केरकचरा, दारूच्या बाटल्या, भंगार साहित्य बाहेर काढलं.मागील चार वर्षापासून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून वर्षातून दोनदा हे दुभाजक स्वच्छ करण्यात येत आहे. यावेळी झाडांना आळे करूनझाडांच्या छाटण्या करण्यात आल्या.कार्य प्रचंड होते, प्रचंड श्रम घेत त्या घाण, केरकचर्यात गुडघाभर ऊंचीच्या वाढलेल्या गवतात उभे राहून सकाळी सहा पासून आठ पर्यत श्रमदान सुरू होते. प्रशासनाला याची जाणीवही नसेल तरीही कुठलीही अपेक्षा न ठेवता ही अशी छोटी छोटी माणसे हे लातूर सुंदर करण्यासाठी दररोज झटत आहेत.आज महाश्रमदान साठी आलेल्या व्यवसायाने डॉक्टर, वकील, शेतकरी, दुकानदार, विद्यार्थी, बँक अधिकारी, व्यवसायीक, नोकरदार अधिकारी, फोटोग्राफर असलेल्या पवन लड्डा, वैशाली यादव, दयाराम सुडे, नागसेन कांबळे, सुलेखा कारेपूरकर, राहुल माने, सिताराम कंजे, बळीराम दगडे, आदित्य स्वामी, प्रवीण भराटे, ओंकार, गणेश सुरवसे, शुभम आवड या सर्व सदस्यांनी स्वच्छ लातूर, सुन्दर लातूर, हरित लातूर करिता परिश्रम घेत अविरत कार्याचा १५४० वा दिवस पूर्ण केला. परिसरातील नागरिकांनी दुभाजकात कचरा न टाकता घंटा गाडी मध्ये कचरा टाकावा असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने दयाराम सुडे यांनी केले.
स्वच्छतेसाठी महाश्रमदान ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम
