• Sun. Aug 17th, 2025

छातीवर तलवार ठेवली तरी मी आता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही : बच्चू कडू

Byjantaadmin

Aug 17, 2023

नागपूर : उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणारे बच्चू कडू मंत्रिपदाची वाट पाहून थकून गेले आहेत. मंत्री होण्याची आता वेळ नाहीये. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी आता मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. तशी वेळ आलीच तर माझे सहकारी आमदार राजकुमार बडोले यांना मी मंत्री करेन, असे वक्तव्य प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मुंबईमधील वांद्याच्या ताज लँड एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजन केलंय. शिवसेना शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री आज संध्याकाळी या स्नेहभोजनाला हजेरी लावतील. या सोहळ्याचे आपल्याला निमंत्रण नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच फोन केला होता पण त्याचा तपशील माध्यमांना सांगण्यासारखा नाही, असे सांगायला देखील बच्चू कडू विसरले नाहीत.

bacchu kadu And Eknath Shinde

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आरूढ झाले. शिंदेंना साथ देण्‍यात बच्‍चू कडू हे अग्रस्‍थानी होते. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. बंडखोरीच्या लढ्यात भक्कम साथ दिल्याने बच्‍चू कडू यांना पहिल्‍या टप्‍प्‍यातच मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा त्‍यांचे समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्‍यक्‍त करत होते, पण त्‍यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू यांनी अनेकदा उघड नाराजी व्‍यक्‍त केली.अलीकडेच त्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्‍यात आला, दिव्‍यांग कल्‍याण विभागाचं अध्‍यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पण, त्‍यामुळे त्‍यांचे कार्यकर्ते समाधानी नाहीत. मंत्रिपदाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या बच्‍चू कडू यांच्‍या समर्थकांमध्‍ये अस्‍वस्‍थता वाढली आहे.

मंत्रिपदाच्या हुलकावणीविषयी बोलताना काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते, “एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आलाय. सगळे काही पदासाठी नसते. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे… मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *