• Sun. Aug 17th, 2025

भाजपला धोबीपछाड देत मविआ मुसंडी मारणार?, ताज्या सर्व्हेत मोठं भाकित

Byjantaadmin

Aug 17, 2023

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी आघाडी काम करत आहे. त्यामुळं आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेची माहिती समोर आली आहे. त्यात महाविकास आघाडीला ४० ते ४५ जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून राज्यातील अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांत सर्व्हे करण्यात आहे. ग्राऊंड लेवलवर करण्यात या सर्व्हेमध्ये असंख्य लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाऊन मतदारांची मतं विचारात घेण्यात आली. त्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० ते ४५ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता काँग्रेसच्या सर्व्हेत भाजप तसेच शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसत असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीने देशभरात सर्व्हे केला होता. त्यात केंद्रातील मोदी सरकारला लोकसभेत पुन्हा बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या सर्व्हेत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व्हेत मतदारसंघातील स्थिती पाहून आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरू केलेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करणार असल्याची नाना पटोले यांनी सांगितलं आहे. याशिवाय महाविकास आघाडीत आम्हाला कुणाबद्दलही संभ्रम किंवा मतभेद नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *