राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘बंडा’च्या वादळानंतर या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता पुन्हा राज्यभर फिरून बंडखोरांचे राजकीय मोपमापच करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मोजक्या सभांपाठोपाठ पवारसाहेब पुढच्या दोन दिवसांत मराठवाड्यांनतर फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात जाणार असून, त्यात बीडमधील पवारसाहेबांच्या सभेकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सभेतून पवारसाहेब हे कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या वाटचालीत काटे टाकणार की, त्यांना सूचक शब्दांत इशारा देऊन परतणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.पण, त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांनी BEED मध्ये पवारसाहेबांच्या स्वागतासाठी फ्लेक्स उभारून ‘साहेब… कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या…’ असे साकडे घातले आहे. यानिमित्ताने मुंडेंच्या समर्थकांनी साथ देण्याचेच आवाहन पवारसाहेबांना केले आहे.
विशेष म्हणजे, या फ्लेक्सवर पवारसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाच फोटो आहे. काहीही असो, पवारसाहेबांच्या सभेआधीच मुंडेंच्या बीडमध्ये राजकीय हवा ‘टाइट’ झाल्याचे दिसत आहे.DCM AJIT PAWAR यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यामुळे पक्षात दोन गट पडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्ष बांधणी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची नवी फौज उभी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.पक्षात पडलेल्या फुटीनंतर मराठवाड्यातशरद पवारची पहिलीच सभा येत्या १७ ऑगस्टला बीडमध्ये होणार आहे. या जाहीर सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण त्याआधीच बीडमध्ये लागलेले फ्लेक्स चर्चेचे ठरत आहेत.