वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज संभाजीनगर येथे मुस्लिम बुद्धीजिवी डॉक्टर, अभियंता, शिक्षक, पत्रकार व निवृत्त न्यायाधीश यांच्यासोबत संवाद साधला. शिवसेनेचे हिंदुत्व मुस्लिम समाजाला विरोध करणारे नसून तर अतिरेक्यांना बडवणारे असल्याचे यावेळी ते म्हणाले.राजकीय पक्ष शिवसेनेपासून मुस्लिम समाज दूर जावा यासाठी हेतूपुरस्कर वाद निर्माण करत असून जाती – जातीत भांडण लावण्याचे काम ते करत आहे.मागील काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या दंगलीच्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी करून आलो. तेथील परिस्थिती बघता या दंगली राज्य सरकारलाच घडवायच्या होत्या का? असा प्रश्न सतत उभा राहत असल्याचे दानवे म्हणाले.यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक विभाग जिल्हाप्रमुख शेख रब्बानी, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात,उप शहरप्रमुख संजय हरणे,न्यायाधीश ए. टी. शहा, नईम खान,डॉ.अनिल पटेल, इरफान शहा, कमरजमा खान, अलीम सिद्दिकी, रफिक नाईकवाडे, अशपाक सिद्दीकी, सलीम सिद्दिकी, रिजवान पटेल, हमीद देशमुख व सलीम शेख उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंच्या कार्यभारावर मुस्लिम समाज समाधानी
मुस्लिम समाजाला विशेष असे काही अधिकार नकोत. राज्यघटनेच्या स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांप्रमाणे वागणूक मिळावी. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे कार्यभार चालवला त्यावर मुस्लिम समाज समाधानी असून आगामी काळात सर्व मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची भूमिका मुस्लिम बुद्धिजीवी लोकांनी दानवे यांच्यासमोर मांडली.