• Sat. Aug 16th, 2025

मविआतून राष्ट्रवादीला वगळून लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा, ठाकरे समर्थक खासदारानं सगळं स्पष्ट केलंं, म्हणाले..

Byjantaadmin

Aug 15, 2023

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा प्रयोग केला. या प्रयोगानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकारनं अडीच वर्ष पूर्ण करताच एकनाथ शिंदे यांच्या बंडानं सेनेला धक्का बसला. त्यानंतर बरोबर एका वर्षानं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. महाविकास आघाडीला या प्रकारे सलग दोन वर्ष दोन मोठे धक्के बसले. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज्यात मोठ्या निवडणुका झालेल्या नाहीत. आगामी २०२४ च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दृष्टीनं मविआच्या वज्रमूठ सभा सुरु होत्या. मात्र, राष्ट्रवादीतील बंडानंतर त्याला ब्रेक लागला आहे. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यात झालेल्या भेटीनं संभ्रमाचं वातावरण मविआत निर्माण झालं आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात इंडिया आघाडीसंदर्भात एक बैठक झाली होती. त्या बैठकीचा संदर्भत देत शरद पवार यांच्याशिवाय २०२४ च्या निवडणुका लढवण्यासंदर्भात प्लॅन बी बाबत चर्चा सुरु असल्याच्या बातम्या सुत्रांच्या हवाल्यानं देण्यात आल्या होत्या. या बातम्यांनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

मविआतून राष्ट्रवादीला वगळून लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा, ठाकरे समर्थक खासदारानं सगळं स्पष्ट केलंं, म्हणाले..

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी असा कोणाताही निर्णय झालेला नाही, असं सांगितलं. आमचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. महाविकास आघाडी कायम राहण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची भूमिका मांडली. आम्ही कालही स्पष्ट केलेलं आहे की जे भाजपविरोधात जे कुणी लढणार आहे त्यांना आमच्यासोबत घेणार आहोत. त्यामुळं प्लॅन बाबत चर्चा सुरु होत आहेत त्या खऱ्या नाहीत, असं नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *