प्रा.संतोष कुंभार यांचा पी.एच.डी मिळाल्याबद्दल नगरसेवक. सुधीर लखनगावे यांनी केला सत्कार
निलंगा:- महाराष्ट्र काँंलेज आँंफ फार्मसी, निलंगा येथील फार्मासुटीकल केमेस्ट्री विषयाचे प्रा. संतोष पंडीतराव कुंभार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने फँंकल्टी आँंफ साँंयन्स अँंन्ड फार्मसी टेकन्वालाँंजी शाखेतील नुकतीच विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली..याबद्दल त्यांचा महाराष्ट्र काँंलेज आँंफ फार्मसी, निलंगा येथील पदवीचे माजी विद्यार्थी तथा शिरुर अनंतपाळ येथील नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी आज सत्कार करुन गुरुप्रती आदर केला..
प्रा.डाँं. संतोष कुंभार यांनी प्राचार्य.डाँं.एस.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ” सिंथेसिस अँंन्ड बायोलाँंजिकल इव्होल्युवेशन आँंफ सम नोव्हेल डेरिव्हेटिव्हझ आँंफ टु अँंझीटिडींनाँंन ” या विषयात संशोधन शोधप्रबंध नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता..
यावेळी माजी विद्यार्थी तथा नगरसेवक.सुधीर लखनगावे, प्राचार्य.डाँं.सिध्देश्वर पाटील,प्रा.डाँं.सुनील गरड,प्रा.डाँं.माधव शेटकार,प्रा.डाँं.शरद उसनाळे,प्रा.रविराज मोरे,प्रा.विनोद उसनाळे,प्रा.शिवराज कुलकणी,ग्रंथपाल.निवृत्ती गारडी,प्रयोगशाळा तंत्रद्य.एल.डब्लु.पाटील,निलंगा विधानसभा युवक काँंग्रेस सरचिटणीस. प्रसाद झरकर, परमानंद बरहानपुरे उपस्थीत होते.
प्रा.डाँं.संतोष कुंभार यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र काँंग्रेस कमिटीचे सरचिटणीस. अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष.विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर,प्राचार्य.भागवतराव पौळ यांनी अभिनंदन केले तसेच या यशाबद्दल प्रा.डाँं.कुंभार यांचे मित्रपरिवार,विद्यार्थी,महाविद् यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे…