जिल्हा काँग्रेस प्रशिक्षण सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी चक्रधर शेळके
निलंगा(प्रतिनिधी) लातूर जिल्हा काँग्रेस प्रशिक्षण सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी चक्रधर शेळके यांची निवड करण्यात आली
दि 12 ऑगस्ट रोजी लातूर लोकसभेचे निरीक्षक आ.संग्राम थोपटे , माजी मंत्री . आ.अमित विलासराव देशमुख , आ. धीरज देशमुख व लातूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, निलंगा काँग्रेसचे तालुकध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती लातूर जिल्हा काँग्रेस प्रशिक्षण सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
चक्रधर शेळके हे महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक ,राजकीय सांस्कृतिक चळवळीत काम केले आहे,मराठा सेवा संघात काम केले आहे, त्यांना संभाजी ब्रिगेडची बुलंद तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ,गेल्या अनेक दिवसांपासून लातूर काँग्रेस पक्षात काम करीत आहेत, लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यातील वाडी वस्ती गाव तांड्यावर त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे .भाषणात मुद्देसूद मांडणी प्रभावी आवाज,उत्तम वक्ता राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सूक्ष्म अभ्यास असल्यामुळे काँग्रेस पक्षाने चक्रधर शेळके यांच्यावर लातूर जिल्हा काँग्रेस प्रशिक्षण सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, या निवडी बद्दल त्यांचें मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत यावेळी विजयकुमार पाटील , डॉ.अरविंद भातांबरे ,माजी सभापती अजित माने ,माजी नगराध्यक्ष हमीद शेख , माजी पंचायत समिती सदस्य विलास लोभे, सोनू डगवाले ,आबासाहेब पाटील ,उपस्थित होते.