• Wed. Aug 13th, 2025

शेतात फवारणी करताना पदर ट्रॅक्टरमध्ये अडकला, पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा तडफडून अंत

Byjantaadmin

Aug 14, 2023

सोलापूर : डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडताना म्हणजेच फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकला. त्यामुळे गळफास बसल्याने पतीदेखत पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला.डोळ्यांदेखत पत्नीचा जीव जात असल्याचे पाहून पतीने खूप आरडाओरड केली होती, पण गळफास इतका घट्ट बसला होता की, काही मिनिटात पत्नी जागेवरच गतप्राण झाली. प्रियांका प्रवीण येलपले (वय २९ वर्ष, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव आहे.रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Solapur Woman Death 900

शेतातील डाळिंबाच्या रोपांना फवारणी करत होते
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते. पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या साहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या.इतक्यात ब्लोअर ढवळणी रॉडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले.
ट्रॅक्टर जाम झाल्याने प्रवीणच्या लक्षात आले
प्रवीण येलपले हे पुढे पाहत ट्रॅक्टर चालवत होते. डाळिंबाच्या रोपांना औषध सोडताना अचानकपणे ट्रॅक्टर जाम झाले. पत्नीचा साडीचा पदर अडकून पत्नी प्रियांका तडफडत होती. गळफास घट्ट बसल्याने प्रियांकाला ओरडता देखील आले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *