आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसही कामाला लागली असून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास काँग्रेसने सुरवात केली आहे.काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बीड लोकसभेसह विधानसभेच्या सर्वच जागा पक्षाने लढवाव्यात, असा पदाधिकाऱ्यांचा सूर निघाल्याचे अमित देशमुखांनी सांगितले. तर येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुखांनीही पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.
या बैठकीनंतर अमित देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीक करत “देशात ‘एनडीए’ला ‘इंडिया’ आघाडी सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे”, असे म्हटले. “सोनीया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, udhav thakre यांच्यासह आदी नेते आघाडीचे नेतृत्व करत असून देशात काँग्रेसला मिळणाऱ्या पाठींब्याचा फायदा राज्यात व जिल्ह्यात महाविकास आघाडीला होणार आहे”, असेही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख देशमुख यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार सिराजोद्दीन देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव रवींद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.”१९९९ पासून आघाड्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यात काँग्रेसवर अन्याय झाला. आघाडीचा धर्म पाळत पक्षाने हा अन्याय सहन केला. पण आता नव्या राजकीय समिकरणामुळे काँग्रेसला लढण्याची संधी निर्माण झाली आहे.लोकसभेसह जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढण्यास पदाधिकारी उत्सुक आहेत. याबाबतचा अहवाल आपण पक्षाला देणार असून यासाठी काही नावेही पुढे येतील”, असेही देशमुख यांनी सांगितले.”काँग्रेसला देशात मिळणाऱ्या पाठींब्याचा महाराष्ट्रात व जिल्ह्यातही mva ला फायदा होईल. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अलिकडे छेद दिला जात आहे”, असे म्हणत राज्यातील संदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुखांनी टोला लगावला.