महाराष्ट्र महाविद्यालयात ग्रीन क्लबची स्थापना
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण,संवर्धन व पाण्याची बचत संयुक्त अभियान राबविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2023- 24 वर्षासाठी ग्रीन क्लबची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थितीमध्ये मिर्झा बेग , ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. शेषराव देवनाळकर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुर्यकांत वाकळे व डॉ.नरेश पीनमकर हे उपस्थित होते.सर्वप्रथम प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनी ग्रीन क्लबचे उद्घाटनपर मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरणात ग्रीन क्लब, सारखे उपक्रम किती महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तर डॉ. नरेश पिनमकर यांनी प्रास्ताविकातून ग्रीन क्लबची बद्दल माहिती दिली. ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ.शेषराव देवनाळकर यांनी नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण,संवर्धन व पाण्याची बचत महाविद्यालयीन युवकांनी कशा पद्धतीने करावी व इतरांना हे ज्ञान अवगत करून देण्यासाठी कशी अंमलबजावणी करावी तसेच ग्रीन क्लबची रचना याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रा. मिर्झा बेग यांनी, विद्यार्थ्यांनी आपले करियर घडवत असताना नैसर्गिक साधनसंपत्ती व पाण्याची बचत याबाब जाणीव ठेवावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी रोहिणी पेटकर व श्रुती कांबळे यांनी केले तर आभार दिव्या राठोड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील ,राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार ,डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा शिल्पा कांबळे , प्रा पृथ्वी फावडे , प्रा संदीप सूर्यवंशी, प्रा अक्षय पानकुरे, प्रा वैभव सुरवसे, यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.