विधवा व घटस्फोटीत 51 महिलांना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनविण्याचा उपक्रम स्तुत्य – आदितीताई अमित देशमुख
अंबाजोगाई रोडवरील एसटी वर्कशॉपसमोर परफेक्शन ब्युटी बारचा थाटात शुभारंभ
लातूर -समाजातील विधवा आणि घटस्फोटीत 51 महिलांना ब्युटी पार्लरचे मोफत अॅडव्हॉन्स प्रशिक्षण देवून त्यांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून स्वावलंबी बनवण्याचा परफेक्शन ब्युटी बारचा आगळा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे प्रतिपादन ट्वेंटीवन अॅग्रीच्या संचालिका आदित्यताई अमित देशमुख यांनी आज 12 ऑगस्ट रोजी येथे केले.
परफेक्शन ब्युटी बार अकॅडमी व दैनिक समीक्षा माध्यम समुहाच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई रोडवरील एसटी वर्कशॉपच्या समोर परफेक्शन ब्युटी बार अकॅडमीचे आज आदित्यताई अमित देशमुख यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी आदित्यताई बोलत होत्या. यावेळी परफेक्शन ब्युटी बार अकॅडमीच्या संचालिका आंचल आग्रवाल, सुप्रीया धुमाळ, संगीताताई मोळवणे, समीक्षा माध्यम समुहाचे संपादक रामेश्वर धुमाळ, कल्पना वानखेडे, अंकूर हायटेक नर्सरीचे संचालक धनंजय राऊत, रामेश्वर धुमाळ यांच्या मातोश्री लतिकाबाई धुमाळ, पाखरसांगवीचे सरपंच भिमाशंकर उर्फ राजाभाऊ लखादिवे, सरलाताई मुंदडा, सरोजा आग्रवाल, महेंद्र मुंदडा, राजकमल आग्रवाल, हंसराज मुंदडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.आदितीताई देशमुख यांना सदर परफेक्शन ब्युटी बार अकॅडमीचे उद्घाटन करून आधुनिक ब्युटी पार्लर व साहित्याची पाहणी केली. आंचल आग्रवाल व रामेश्वर धुमाळ यांनी त्यांचे स्वागत करून सदर अकॅडमीच्या विविध कोर्सेसची व आधुनिक सौंदर्य साहित्याची माहिती दिली. संगीताताई मोळवणे यांनी या आधुनिक ब्युटी अकॅडमीच्या व्यवसायीकतेमध्ये देखील विधवा व घटस्फोटीत 51 महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांच्या त्यांच्या पायावर उभे करण्याचा मानस हा सामाजिक बांधिलकीचा असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामेश्वर धुमाळ यांनी केले. तर सुप्रिया धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा धुमाळ, सुरेश ढवळे, सचिन सुर्यवंशी, कल्पना वानखेडे, आंनद दणके, नितीन पडिले, करण शिंदे, सुनील फुलारी, दयानंद एरंडे, संतोष साखरे, महेश क्षिरसागर, महेश सुर्यवंशी, प्रथमेश गोताळकर व धुमाळ मित्रमंडळानी परिश्रम घेतले.