• Sat. Aug 9th, 2025

शिंदे गटाच्या आमदाराने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या पत्रकाराचा कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा

Byjantaadmin

Aug 12, 2023

पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला होता. या हल्ल्यात संदीप महाजन हे जखमी झाले होते. तरी देखील पोलिस माझ्या तक्रारीसह मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 15 ऑगष्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिली आहे. इतकेच नाही तर आपण कुटूंबासह आत्महत्या करणार असल्याचेही ते म्हणाले.

चार पाच जणांच्या टोळक्याने पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. महाजन त्यात गंभीर जखमी झाले होती. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

पत्रकार संदीप महाजन यांनी पाठवलेला संदेश

‘आमदार किशोर पाटील, त्यांचा मुलगा सुमीत, त्याचे नातेवाईक व ठेकेदार पदधिकारी, त्यांचे समर्थक यांच्या कडून केली जाणारी बदनामीसह दहशत आणि सदर प्रकरणी दुर्लक्षीत करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हयातील मंत्री त्यांच्या इशारावर चालणारे व माझ्या तक्रारीसह मागणीला दुर्लक्षीत करणारे पोलीस प्रशासन यांनात्रासुन अन्याय-अत्याचार ग्रस्थ पत्रकार संदीप महाजन ( पाचोरा ) आपल्या कुटूंबासह 15 ऑगष्ट रोजी आत्महत्या करणार’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *