• Tue. Mar 24th, 2026

पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे, राहुल गांधींचे मोदींना उत्तर; संसदेतल्या भाषणाची ‘जोकबाजी’ म्हणत निर्भत्सना!

Byjantaadmin

Aug 11, 2023

पंतप्रधानांनी संसदेत 2 तास 13 मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त दोन मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत लहान मुलांना मारले जात आहे. दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून हसून बोलत होते. जोक करत होते, हसून बोलत होते. हे पंतप्रदानांना शोभत नाही, अशी टीका राहुल गांधींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींवर केली.जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान 2 तासं त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.मी गेल्या अनेक वर्षांत अनेक संकटांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये फिरलो आहे. गेल्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले तसे कधीही पाहिले ऐकले नव्हते. मी संसदेत म्हटलो की, पंतप्रधान अमित शहा यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. हे मी विनाकारण बोललो नव्हतो, ते पोकळ शब्द नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी सांगितला अनुभव

मणिपूरमध्ये दौऱ्यासाठी गेलो तेव्हा आम्ही मेईतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला स्पष्ट सांगितले होते की, तुमच्या सुरक्षा रक्षकांमध्ये कुकी असेल तर त्याला आणू नका, आम्ही त्याला गोळ्या घालू. आम्ही कुकींच्या भागात गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, मेईतेईंना आणू नका आम्ही त्यांना गोळ्या घालू. त्यामुळे आम्हाला मेईतेई आणि कुकींना वेगळे करावे लागले. म्हणजे एक राज्य नाही, त्याचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मी म्हटलो की, मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या भाजपने केली आहे, असा आरोप त्यांनी केला.या सर्वानंतर जेव्हा मी पंतप्रधांना हसताना, जोक करताना पाहिले, तेव्हा मला प्रश्न पडला की ते असे कसे करू शकतात. पंतप्रधानांना जायचे नसतील तर जाऊ नये. त्यांची न जाण्याची कारणे आहेत, ती मी सांगू शकत नाही. पण त्यांना जायचे नसेल, तर किमान मणिपूरवर बोलायला तरी हवे, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांचे भाषण देशाबद्दल नव्हते, स्वतःबद्दल होते
कालचे पंतप्रधानांचे भाषण भारताबद्दल नव्हते, ते नरेंद्र मोदींबद्दल होते. ते त्यांच्या राजकारणाबद्दल होते. पंतप्रधानांना स्वतःबद्दल सांगायचे आहे, ते 2024 मध्ये पंतप्रधान होतील, ही नंतरची गोष्ट आहे. हे त्यांनी सभेत सांगावे. पण संसदेत मणिपूरवर चर्चा होत होती. त्यावर ते काहीच बोलले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.सरकार म्हणते की त्यांनी मणिपूरमधील यंत्रणा बदलून टाकली, मग त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? मणिपूरमध्ये जी हजारो शस्त्रे लुटली गेली ती सरकार असतानाच लुटली गेली. जी हिंसा सुरू आहे, तशी हिंसा सुरूच राहावी, अशी अमित शहांची इच्छा आहे. तिथे जे घडत आहे ते मुख्यमंत्री असतानाच घडत आहे.

पत्रकाराने जयराम म्हटले तर राहुल जय सियाराम म्हटले
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राहुल गांधींना जयराम म्हटले, तर राहुल यांनी त्यांना जय सियाराम म्हटले. पत्रकाराने विचारले – तुम्ही 37 मिनिटांचे भाषण केले. पण तुम्हाला टीव्हीवर 14 मिनिटेच दाखवले. या परंपरेकडे तुम्ही कसे पाहता? राहुल म्हणाले- कदाचित पंतप्रधानांना माझा चेहरा बघायचा नसेल. त्यांना माझा टीव्हीवरचा चेहरा आवडत नाही. पण मला माझे काम करावे लागेल. जिथे जिथे भारतमातेवर हल्ला होईल तिथे मी तुम्हाला उभा दिसेन, असे राहुल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *