लातूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी आढावा घेणार
लातुर लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघ चाचपणी करणार
लातूर ;-देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुक २०२४ साठी लातूर जिल्हा व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालय छत्रपती चौक लातूर येथे १२ ऑगस्ट रोजी शनीवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून ही आढावा बैठक लातूर काँग्रेसचे लोकसभेचे निरीक्षक आमदार श्री.संग्राम थोपटे,राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार अमितजी देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धिरजभैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या आढावा बैठकीस लातूर लोकसभा मतदार संघातील लातूर जिल्हा व लोहा कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक,शहर/जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, NSUI, सोशल मिडिया इंटक, विलासराव देशमुख युवा मंच, रोजगार व स्वयंरोजगार विभाग ग्राहक संरक्षण विभाग ,असंघटित कामगार विभाग आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे व शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव यांनी केले आहे