अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निलंगा राष्ट्रवादीचा मोर्चा
निलंगा (प्रतिनिधी)कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संतप्त झालेल्या निलंगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवाजी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी, जेष्ठ नेते पंडितराव धुमाळ, युवकचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, मा नगरसेवक हसन चाऊस,कार्याध्यक्ष महेश चव्हान, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे, जिल्हाउपाध्यक्ष अंगद जाधव, महिला आघाडीच्या पानफुलताई पाटील, महादेवी पाटील, जेष्ठ नेते विलास माने, रोहित पाटील, गफार लालटेकडे, वैजनाथ चोपणे, दिलीप माकणीकर, सुग्रीव सुर्यवंशी, परमेश्वर जिवलग, संगीता कदम, मुन्नाबाई मोमीन, संगीता सुर्यवंशी, प्रल्हाद पाटील, रवी पाटील, राहुल महामुनी अदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.