मोदी आडनाव बदनामीच्या वादावरून खासदारकी गमावलेल्या पण सुप्रीम कोर्टातून तीच खासदारकी पुन्हा मिळवून लोकसभत आलेल्या राहुल गांधी यांच्यामागे आता ‘फ्लाईंग किस’चा भुंगा मागे लागू शकतो. परिणामी मोदी आडनाव प्रकऱणाचे वादल शमले असले तरी राहुल गांधींना आता नव्या वादात ढकलून त्यांची पंचाईत करण्याची मोर्चेबांधणी सत्ताधारी भाजप करत आहे. ‘फ्लाईंग किस’चा मुद्दा उकरून काढत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी बाब म्हणजे लोकसभेत २०१९ सालच्या निवडणुकीत राहुल गांधींना धूळ चारणाऱ्या इराणी पुन्हा राहुल यांच्या विरोधातच नवी मोहीम उघडली आहे.. परिणामी संसदेत मोदी -शहा विरूद्ध राहुल गांधी असा सामना रंगत असतानाच इराणी यांनी आणखी एक नवा मुद्दा पुढे आणला आहे. त्याचे देशभरात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे?
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
स्मृती इराणी संसदेत बोलताना म्हणाल्या, “मी एक गोष्ट सभागृहातच्या समोर आणत आहे. ज्यांनी माझ्या आधी लोकसभेत भाषण केलं (राहुल गांधी) त्यांनी जाता जाता एका विचित्र लक्षणाची प्रचिती दिली. हे एका पुरूषीवर्चस्ववादी विचार असणाऱ्या व्यक्तिकडून असे वर्तन घडू शकते. त्यांनी संसदेच्या सहा महिलांना ‘फ्लाईंग किस’ दिल्याचा इशारा केला. अशा प्रकारच्या सभ्यता नसलेल्या वर्तनाला या देशाच्या सभागृहात कधीच पाहिलं गेलं नाही. हे कोणत्या कुटुंबाचे लक्षण आहे, हे आज देशाच्या लक्षात आले.”दरम्यान राहुल गांधी संसदेतील भाषणावेळी गोंधळ सुरू होता. सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. भाषण संपल्यानंतर गांधी RAJSTHAN च्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती होती. त्यावेळी जाताना विरोधकांकडे बघून त्यांनी त्यांनी इशारा केला, त्यांनतर स्मृती इराणीयांनी राहुल गांधींवर हा आरोप केला आहे. गांधीवर केलेला हा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे.
बावीस महिलां खासदारांनी तक्रारीचे पत्र :
बावीस महिला सत्ताधारी खासदारांनी याबाबत लोकसभा सचिवालयात पत्र पाठवले आहे. यामुळे राहुल गांधीना ‘फ्लाईंग किस’ प्रकरण राहुल गांधींना भोवण्याची शक्यता आहे. राहुल गांधींवर कारवाईची मागणी होत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करा, अशी भाजप खासदारांची मागणी आहे. ‘या बाबतीत तपास करून कारवाई करू, असे सचिवालयातून सांगण्यात आले आहे.