• Fri. Jun 20th, 2025

मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त खासदार आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

Byjantaadmin

Aug 9, 2023

मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त खासदार आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील -शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

 

LATUR शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी घेऊन मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम संभाजीनगर मध्ये पहिली शाखा शिवसेनेची सुरुवात झाली आणि बघता बघता शिवसेनेचा भगवे वादळ आठही जिल्ह्यांमध्ये पसरलं मी माझं भाग्य समजतो मला तिन्ही पिढ्यांमध्ये काम करता आल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतही व व तिसरी पिढी युवा सेना प्रमुख आदित्य उद्धव  ठाकरे यांच्या सोबतही मला काम करताना खूप आनंद होतोय. निश्चित स्वरूपान शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची शिदोरी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे जडणघडण होत असताना. तुम्हाला आता मराठी मधून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील .निश्चितच सत्ता परिवर्तन होणार आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल परंतु शिवसेनेचा नेता म्हणून माझ्या कडच्या सर्व जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाची बांधणी व्यवस्थित करून घेत आहे. जिल्हाप्रमुखापासून ते गटप्रमुखापर्यंत या सर्व नियुक्त्या झाल्या पाहिजेत गाव तिथे शाखा झाली पाहिजे घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे त्याच पद्धतीने ग्राउंड लेव्हल पासून उभारणी करणार निश्चित स्वरूपाने मराठवाड्यातील प्रत्येक माणूस जात,पात , पंत विसरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या कोरोना काळातील कामाची पावती म्हणून खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा राहणार आहेत असा आत्मविश्वास मला वाटतो. होय निश्चितच या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्री देण्याचा अमित शहा , देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळाने मातोश्रीवर कबूल केले होते. त्या बैठकीत मी स्वतः हजर होतो साफ साफ खोटं बोलतात भारतीय जनता पार्टी वाले आणि उद्धवजींना फसवण्याचा काम त्यांनी केलं पण महाराष्ट्रातील जनता उद्धव साहेब यांच्या कामामुळे अतिशय समाधानी असून उद्धव साहेबांना निश्चितच महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये नंबर एकच स्थान मानाचे स्थान मिळवून दिलेला आहे झालेल्या सर्वे मध्ये एकंदरीत देशातल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एक क्रमांकाचे स्थान पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना होतं मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ पाहून प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे देशाचं नेतृत्व करतील. या भीतीपोटी भाजप ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांना हाताशी धरून काही गद्दारांना फोडून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसला याचा बदला आम्ही निश्चित घेणार आहोत. आणि मी शिवसेनेचा नेता या नात्याने माझ्याकडल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बांधणी शंभर टक्के पूर्ण करून घेणार आहे. याप्रसंगी दोन्ही जिल्हाप्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना आदरणीय खैरे साहेब यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे या सर्व नियुक्त करून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक आणि शिवसेनेची बांधणी पूर्ण झाली पाहिजे त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहाव आव्हान सन्माननीय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांनी केला आहे.याप्रसंगी लातूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले. सर्व तालुकाप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्राचा आढावा सादर केला. या समारंभाला संभाजीनगर शहराचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी साहेब सेना भवन वरून विधानसभा वाईज नेमण्यात आलेले विधानसभा प्रमुख सुनील वेंगुर्लेकर ,जीवन सावंत , देवेंद्र कांबळे , मुर्गिस पिल्ले , महिला संपर्कप्रमुख संपदा ताई गडकरी हे हजर होते. या मेळाव्याला लातूर जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, योगेश स्वामी, बजरंग जाधव, हरिभाऊ सगरे, भारत सांगलीकर, बाळासाहेब अंकुश, विलास पवार, नंदकुमार पवार, संतोष रोडगे, दत्ता कलाले, मुक्तेश्वर पाटील, प्रवीण मगर, सूर्यकांत चव्हाण, निलेश मद्रेवार,राहुल मतोळकर, लक्ष्मण पेठकर, सुभाष गुंडीले, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, महानगर संघटक बालाजी जाधव, शहर प्रमुख सुनील बसपुरे, रमेश माळी, तालुका प्रमुख बाबुराव शेळके, तानाजी सुरवसे, अविनाश रेशमे, भागवत वांगे, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख बस्वराज मंगरुळे, एस.आर. चव्हाण, विधानसभा समन्वयक युवराज वंजारे, विधानसभा संघटक माधव कलमुकले, शंकर रांजंकर,भास्कर माने, हिरालाल साबळे, शंकर गांगणे, महेश चांदणे, यांच्या सोबत सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *