• Wed. Jun 18th, 2025

स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनानिमित्त महाविकास आघाडी व सर्वपक्षीयच्या वतीने विनम्र अभिवादन

Byjantaadmin

Aug 5, 2023

विकासरत्न स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनानिमित्त महाविकास आघाडी व सर्वपक्षीयच्या वतीने विनम्र अभिवादन

निलंगा- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष,विकासरत्न स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी महाविकासआघाडी सर्वपक्षीय पदाधिकारी व जनतेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करून सिंदखेड रोड येथे असलेल्या दादाबाग समाधीचे दर्शन घेतले.यावेळी अनेक मान्यवरांनी दादासाहेबांनी केलेल्या विकास कामाची व त्यांच्या कार्याची कौतुक करून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी निलंगेकर परिवारातील प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,राष्ट्रवादीचे पंडितराव धुमाळ,शहराध्यक्ष इस्माईल लदा फ,शिवसेनेचे ईश्वर पाटील,हरिभाऊ सगरे,भटक्या जाती जमातीचे नेते विलास माने,डॉक्टर सेलचे अरविंद भातांबरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे विधी विभागाचे अध्यक्ष रवी प्रकाश जाधव,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,माजी सभापती अजित माने,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे लाला पटेल,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,सुरेंद्र धुमाळ,रमेश मोगरगे,दिनकर नितुरे,अजित नाईकवाडे, नगरसेवक सुधीर लखनगावे,ग्राहक संरक्षण काँग्रेस सेलचे भरत बियाणी, तुषार सोमवंशी,सा. कार्यकर्ते रजनीकांत कांबळे, गोविंद सूर्यवंशी,पंकज शेळके,महेश देशमुख,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील,संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम,महेश चिकराळे, विलास मुगळे,गुंडेराव बिराजदार,ऍड.तिरुपती शिंदे,व्यंकटराव शिंदे,महेश देशमुख,बाबुराव पाटील,दत्ता पाटील हेलंब,लतीफ पटेल व तसेच विवीध सामाजिक संघटना,कर्मचारी वृंद,शासकीय अधिकारी,महिला आघाडी,जिल्हा व परजिल्ह्यतून जनतेनी भाऊगर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *