• Wed. Jun 18th, 2025

स्वाभिमानाच्या विरोधात काम करु शकत नाही’, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा कोर्टरुममध्ये राजीनामा

Byjantaadmin

Aug 4, 2023

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार कोर्टाचे कामकाज नियमित वेळेपूर्वी आटोपत न्यायालयात न्यायमूर्ती रोहित देव यांनी राजीनाम्याची घोषणा केली. देव यांच्या राजीनामा देण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र निवृत्तीला 1 वर्ष शिल्लक असताना त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Rohit Deo

देव यांनी आपल्या राजीनामा देण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले नाही. परंतु ते म्हणाले की स्वत:च्या स्वाभिमानाच्या विरोधात वागू शकत नाही. न्यायमूर्ती देव यांनी 2022 मध्ये कथित माओवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत ​​उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती देव यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या ठरावाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. ज्यात समृद्धी महामार्गाच्या बांधकाम संबंधित कंत्राटदारांकडून गौण खनिजांच्या अवैध उत्खननाबद्दल महसूल विभागाने राज्याला दंड ठोठावला होता.

रोहित देव यांची 5 जून 2017 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती देव यांची नंतर 12 एप्रिल 2019 रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची सेवानिवृत्ती तारीख 4 डिसेंबर 2025 होती. मात्र त्याआधीच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *