लातुरात बसपा आक्रमक, भिडेंच्या प्रतीमेला शाई फासून जोडे मारले ! भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये डांबा
– बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर – थोर समाजसुधारक महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधीसारख्या महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अवमान करणार्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आज 3 ऑगस्ट रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सकाळी 11 वाजता बहुजन समाज पार्टीच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडेंच्या प्रतिमेला काळी शाई फासून बुटाने हाणण्यात आले. तसेच या मनोरुग्ण भिडेंवर शासन व प्रशासनाने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करून जेलमध्ये डांबण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन बहुजन समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना देण्यात आले. सदरचे आक्रमक आंदोलन बसपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वनाथ आल्टे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
गांधी चौकातील आंदोलनात भडव्या भिडयाचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानो का राज बदल दो, भिडेला पाठीशी घालणार्या सरकारचा धिक्कार असो, मनोहर भिडे तोंडात किडे म्हणून भूंकतोय सगळीकडे अशा घोषणा देण्यात आल्या. शिवाय भिडेंच्या प्रतिमेला शाई फासून व बुटाने हाणून भिडेंचा तीव्र निषेध करण्यात आला. जर 4 ऑगस्टला भिडे समर्थकांनी प्रशासनाची परवानगी नसताना लातूरव्या दयानंद सभागृहात भिडेंचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन भिडेंना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया बसपा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ आल्टे यांनी यावेळी दिली.
या आंदोलनात बसपा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ आल्टे, जिल्हा प्रभारी उदय सोनवणे, सिद्धार्थ सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष जोतिराम लामतुरे, जिल्हा कोषाध्यक्ष शंकर जाधव, महिला आघाडी प्रमुख पंचशीला रणदिवे, खंडेराव भोजराज, गौतम सोनवणे, नितीन गायकवाड, रुपेश गायकवाड, अविनाश रंणदिवे, चंद्रकांत चक्रे, सचिन भूतकर, अमर जाधव, अतिश सातपूते, निवृती कांबळे, शेखर मगर, दिपक सावंत, राजू कांबळे, अनिल कांबळे, व्यंकट बरगे, आम्रपाल बनसोडे, सूर्यादय सोनवणे, प्रतीक लोखंडे, शरीफखान पठाण, नागेश कांबळे, रोहित श्रृंगारे, अनिकेत श्रृंगारे, रुक्मीणी कांबळे, प्रीती चिंचले, संजय चिंचले, सुधीर कांबळे, प्रवीण गायकवाड, सुखदेव राठोड आदींसह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
लातुरात बसपा आक्रमक, भिडेंच्या प्रतीमेला शाई फासून जोडे मारले !
