अशोकराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रेत हजारो कार्यकर्ते नांदेड येथे दाखल
निलंगा- विधानसभा काँग्रेस कमिटीचे च्या वतीने नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघासह तालुक्यातील 64 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवून राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते जम्मू कश्मीर भारत जोडो यात्रेला पाठींबा देऊन सहभाग नोंदविला.यावेळी अशोकराव म्हणाले की,देशातील वाढती महागाई,बेरोजगारी,व धर्माधर्मामध्ये जातीयवाद निर्माण करत असलेल्या भाजपा सरकारला विरोध करण्यासाठी स्वातंत्र्यच्या दुसऱ्या युद्धात देश एकसंघ ठेवण्यासाठी सर्व जातीधर्मानी एकत्र येऊन अखंड भारत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुट होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले,
यावेळी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाचे देशातील व राज्यातील आलेल्या प्रमुख नेत्या बरोबर भेटी गाठी घेऊन यात्रे दरम्यान स्वर्गीय निलंगेकर साहेब यांच्या आठवणी जागृत करून त्यांच्या स्वातंत्र्याचा काळात त्यांनी केलेल्या उल्लेख निय कार्याची दखल व काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याचे अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले.यावेळी पदयात्रे संकल्पक जयराम रमेश,दिग्विजय सिंग, बाळासाहेबथोरात,भाई जगताप,एच के पाटील,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोकराव चव्हाण,सुशील कुमार शिंदे,सचिन सावंत,रजनीताई पाटील,कै कृष्णकांत पांडे,नसीम खान,नायमूर्ती बी जी कोळसे पाटील,योगेंद्र यादव इ.सह विविध प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांची भेटी गाठी झाल्या.
निलंगा शहरातून सर्वप्रथम स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून वाहनाच्या ताफ्यासह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तर यात्रेस जात असताना वलांडी व देवणी येथील कार्यकर्ते वाहनांसह सहभागी झाले.वलांडी येथे फटाक्याच्या अतिषबाजीने तर देवणी येथे ढोल-ताशासह अशोकराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार राम भंडारे,मलिकार्जुन मानकरी,वैजिनाथ लुल्ले,जावेद तांबोळीसह सर्व नगरसेवकांनी केला.यावेळी राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है..नफरत छोडो.. भारत जोडो..अशा घोषणा देण्यात आल्या.
या यात्रेत सहभागी झालेल्या मध्ये सर्व अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष लाला पटेल,शिवसेना नेते ईश्वर पाटील,विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,सुरेंद्र धुमाळ,माजी नगरसेवक सिराज देशमुख,माजी सभापती अजित माने,विशाल जोडदापके,संतोष नाईकवाडे,लक्ष्मण बोधले,एनएसयुआयचे प्रसाद झरकर,लक्ष्मण बोधले, वैशंपायन जागले,नगरसेवक सुधीर लखनगावे,रमेश मोगरगे,मंगेश चव्हाण,महेश पाटे,दिनकर दाजी बिराजदार,रणजित कोकणे,पुंडलिक बिराजदार,पंडितराव भदरगे,अब्रार देशमुख,साहेबराव भोयभार,ऍड तिरुपती शिंदे,विक्रांत सूर्यवंशी,नगरसेवक विकास नाईकवाडे,बुद्धीवंत पांचाळ,मा. नगरसेवक असगर अन्सारी,प्रकाश जाधव,जयप्पा हत्ते,राजेंद्र वारद,अण्णा नायब,निराधार सदस्य गोविंद सूर्यवंशी,प्रशांत येळकर,अजय कांबळे, बालाजी काबळे,दत्ता पाटील,मैनिद्दीन मणियार,तुषार माकने,बालाजी गाडीवान,आयुब चौधरी,रिजवान शेख,सुभाष नाईकवाडे,नवाज पठाण,लिंबराज जाधव,महेश कदम इ.पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पदयात्रेत सहभाग नोंदविला.