भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
निलंगा , ( प्रतिनिधी)- दि 1 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे पाटील यांनी आज मुंबई येथे भारत जोडो अभियानास सक्रिय पाठींबा दर्शवल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर येथून ही यात्रा महाराष्ट्रात आगमन झाल्याने . या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,काँगेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटुन यात्रेसंदर्भात विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली आणि त्यांच्या समवेत ऐतिहासिक यात्रेत सहभाग नोंदवला . तसेच नांदेड जिल्ह्यात यात्रेच्या सर्व मार्गावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने खा. राहुल गांधी यांचे स्वागत असे सांगितले.
संभाजी ब्रिगेडने नेहमी संविधानाचा आदर केला आहे. धार्मिक विषमता नष्ट होण्यासाठी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आहेत. सर्व जाती, धर्म, पंथ एकत्र नांदावेत अशी वेळोवेळी भूमिका संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे. भारत जोडो यात्रा समाजाला जोडण्याचे काम करत असल्यामुळे संभाजी ब्रिगेडने या यात्रेला पाठिंबा दिला आहे, असे मत यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनी मांडले शहराध्यक्ष परमेश्वर बोधले,अमोल माने कुणाल पाटील इर्शादआलम शेख,मराठा सेवा संघाचे सल्लागार ऍड तिरुपती शिंदे,गोपाळजी पवार सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . देगलूर,येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने खा. राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला