• Tue. Apr 29th, 2025

‘माझी माती, माझा देश’ या अभियानात भाग घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नागरिकांना आवाहन

Byjantaadmin

Aug 1, 2023

‘माझी माती, माझा देश’ या अभियानात भाग घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नागरिकांना आवाहन

लातूर  ( जिमाका ) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त देशभरात अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन दिल्लीत पोहोचेल. देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत. राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ कलशातील माती आणि झाडे टाकून ‘अमृत उद्यान’ बांधण्यात येईल. हे अमृत उद्यान ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चे भव्य प्रतीक बनेल. यासाठी जिल्हा परिषदेकडून एक मोबाईल अँप तयार करण्यात आले आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे. त्यासाठी खालील लिंक दिली आहे.

“माझी माती, माझा देश” उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील रहिवाशांसाठी विशेष वेबसाईट

merimatimeradeshlatur.in ह्या संकेतस्थळावर आपला मातीसोबत सेल्फी अपलोड करा व १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ह्याच संकेतस्थळावरुन इ-प्रमाणपत्र प्राप्त (डाउनलोड) करा. सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.- मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक,जिल्हा परिषद, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed