• Mon. Apr 28th, 2025

अखेर ठरलं! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

Byjantaadmin

Aug 1, 2023

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला होता. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांच्यांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपावली आहे. मात्र विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवलं. त्यामुळे आमदारांच समर्थन लक्षात घ्यायच की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते विदर्भाच प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातले आहेत आणि विरोधी पक्षनेते देखील विदर्भातील आहे. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत आणि विजय वडेट्टीवार सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पद एकाच समाजातून देत हे ही सामाजिक समीकरण निर्णय घेताना काँग्रेस समोर ठेवल्याचे पाहायला मिळते.

Maharashtra congress Vijay Wadettiwar was appointed as the Leader of the Opposition in the Legislative Assembly Opposition  Leader: अखेर ठरलं! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची  नियुक्ती

पावसाळी अधिवेशन  4 ऑगस्टपर्यंत

विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे.MAHARASHTRA  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन  4 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन होत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये जे कोणी विरोधीपक्ष नेते झाले.  ते भाजपच्या गळाला  लागून सत्ताधारी पक्षांत  जाऊन बसलेले पाहायला मिळतात.  त्यामध्ये एकनाथ शिंदे ,राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि ते आता सत्तेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा ही इतिहास लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे.

संख्येच्या जोरावर विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला

2019 च्या निवडणुका झाल्या त्यावेळी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता. पण शिवसेना, राष्ट्रवादीत झालेल्या फुटीमुळे काँग्रेस आपोआप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. संख्येच्या जोरावर विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed