नवी दिल्ली:-आर्थिक उदारीकरणाच्या धोरणासाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशंसा केली आहे. टीआयओएल २०२२ पुरस्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
गोरगरिबांना फायदा होईल अशा उदार आर्थिक धोरणाची भारताला गरज आहे. सन १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला नवी दिशा मिळाली. ९० च्या दशकात महाराष्ट्रात मंत्री होतो. त्यावेळी रस्ते बांधकामाला पैसा गोळा करण्यासाठी खूप अडचणी होत्या. मनमोहन यांनी सुरु केलेल्या आर्थिक सुधारणांमुळेच निधी जमवण्यात यशस्वी झालो असे गडकरी म्हणाले.