• Tue. Jun 10th, 2025

लातूर शहरातील राजर्षी शाहु कॉलेज समोरील काकुशेट उक्का मार्ग हा एकेरी मार्ग म्हणून निश्चित

Byjantaadmin

Jul 29, 2023

लातूर शहरातील चंद्रनगर येथील काकूशेठ उक्का मार्गावर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय असून या मार्गावर विधार्थ्याची मोठया प्रमाणात वर्दळ / रहदारी असते. या मार्गावरच ब-याच बँका, खाजगी क्लिनिक, ऑप्टिकल, मेडीकलची, झेरॉक्सची इ. दुकाने असून तेथील रस्ता अरुंद असल्याने सतत मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक व्यवस्था ठप्प होत असल्‍याने तसेच शहरातील वाहतुक व्यवस्थेबाबत दिनांक २७.०४.२०२३ रोजी घेण्‍यात आलेल्‍या बैठकीस परीवहन विभाग (RTO), पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्वानुमते राजर्षी शाहू कॉलेज समोरील मार्ग हा एकेरी मार्ग व चारचाकी वाहनांसाठी नो पार्किंग झोन करणेस सहमती दर्शविल्‍याने प्रायोगिक तत्वावर एक महिन्याकरीता राजर्षी शाहू महाविद्यालय समोरील काकुशेट उक्‍का मार्गाचा वाहतुकीसाठी वापर खालीलप्रमाणे निश्चीत करण्यात आला होता.

१. बसस्थानकासमोरुन काकुशेट उक्‍का मार्ग ते गांधी चौकाकडे जाणेसाठी सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग म्हणून निश्चीत करण्यात येत आहे.

२. सदर मार्गावर चार चाकी वाहनांना सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यत नो पार्किंग झोन म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

३. गुळ मार्केटकडून काकुशेट उक्‍का मार्गावरुन बसस्थानकाकडे मेन रोडला येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल त्यामुळे वाहन धारक सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून गुळ मार्केटकडुन BSNL ऑफिससमोरील रस्त्याने महात्मा गांधी चौकास वळसा घेवून बसस्थानक / हनुमान चौकाकडे जाणेसाठी या मार्गाचा वापर करतील.

राजर्षी शाहू महाविद्यालय समोरील काकुशेट उक्‍का मार्गाच्‍या एकेरी वाहतुकीसाठीचा संदर्भीय आदेश प्रथमतः एक महिन्‍याच्‍या कालावधीकरीता प्रायोगिक तत्‍वावर निर्गमित करण्‍यात आले होते, तथापि उक्‍त ठिकाणी एकेरी वाहतुकीचा केलेला प्रयोगामुळे सदर ठिकाणच्‍या वाहतुकीस ब-याच प्रमाणात शिस्‍त लागल्‍याने एकेरी वाहतुकीचे आदेश कायम ठेवण्‍याबाबत पोलिस निरीक्षक ,शहर वाहतुक शाखेच्‍या मागणीनुसार उक्‍त आदेशातील राजर्षी शाहू महाविद्यालय समोरील काकुशेट उक्‍का मार्गाच्‍या रस्‍त्‍यावरील एकेरी वाहतुकीचा आदेश पुढील कालावधीसाठी कायम ठेवण्‍यात येत आहे.

तरी सर्व नागरीकानी बस स्थानकसमोरील काकुसेठ उक्का मार्ग एकेरी वाहतुकीसाठी घोषित केलेप्रमाणे वापर करून दुहेरी वाहतुकीसाठी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *