निलंगा येथे भागवत कथेचे आयोजन
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा शहरात प्रथमच माहेश्वरी परिवाराच्या वतीने दिंनाक 31 जुलै ते 6 ऑगस्ट या दरम्यान परमपूज्य पंडीत विजयकुमार जी पल्लोड यांच्या अधिपत्याखाली श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पञकार परिषदेत देण्यात आली.
दिनांक 31 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मातोश्री सभागृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे वृंदावन मंगल कार्यालय मंगल कलश शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .या शोभायात्रेत सर्व समाजाच्या महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत त्यानंतर दुपारी दोन ते सहा भागवत कथेला सुरुवात होणार आहे .
मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सती चरित्र .ध्रुव चरित्र. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी श्री नरसिंह अवतार. गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव शुक्रवार चार ऑगस्ट रोजी गोवर्धन पूजा गोपी गीत 56 भोग शनिवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण रुक्मिणी मंगल विवाह .रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सुदामा चरित्र व कथासमापन या विषयावर परमपूज्य पंडित श्री विजयकुमार पल्लोड या विषयावर कथा सांगणार आहेत .रविवारी कथेच्या समारोप नंतर दिनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान गुरुवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर व पाच ऑगस्ट रोजी संस्कार शिबिराचे हे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस भागवत कथा संयोजन समितीचे रामबिलासजी धूत ओमप्रकाश बाहेती पांडुरंग तोष्णीवाल रवींद्र अग्रवाल शितल राठी लक्ष्मीकांत सोमानी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती अनिल अग्रवाल सुभाष सोमानी सुदीप जाजू ललित सोमानी रमण जाजू आदी उपस्थित होते. मंगल कलश शोभा याञा व वृंदावन मंगल कार्यालय निलंगा येथे दररोज दुपारी दोन ते सहा या वेळेत आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास सर्व समाजाच्या महिला व पुरुष, भाविक भक्तांनी उपस्थित राहुन कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समीतीच्यावतीने करण्यात आले आहे.