निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कासार सिरशी येथील अप्पर तहसील कार्यालय तात्काळ रद्द करा*
निलंगा- औसा मतदार संघातील निलंगा तालुक्यातील 68 गावामध्ये कासार सिरशी येथे अप्पर तहसील कार्यालयाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे.या कार्यालयाला या भागातील 50 ग्रामपंचायतीने ठराव घेऊन विरोध करून एक दिवसीय धरणे आंदोलन केले.याच धर्तीवर निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने मा.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन व महाविकास आघाडी च्या पाठिंब्याने विरोध दर्शविला .कारण हा तालुका स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलाआहे.त्यांनी या तालुक्यातील सर्व जनतेला सुखी सुविधा उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातुन निलंगा शहरामध्ये विभागीय कार्यालय त्यामध्ये सार्व.बां.विभाग,निम्न तेरणा,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभागीय कार्यालय,उपविभागीय पोलीस कार्यालय,जिल्हा सत्र न्यायालय,तहसील,पंचायत समिती, हे सर्व कार्यालय,मोठया प्रस्थ इमारती उभ्या केल्या.परंतु औसाच्या आमदार मताचे राजकारण करून या तालुक्यामध्ये विकास रुपी आणलेल्या कामाचे तुकडे करून या तालुक्याचे नुकसान करीत आहेत.हे या तालुक्यातील जनतेला मान्य नसून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे कार्यालय रद्द करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे दिली आहे.या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष(डॉ.सेल)अरविंद भातांबरे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, राष्ट्रवादी नेते पंडितराव धुमाळ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष इस्माईल लदाफ,काँग्रेस प्रवक्ते चक्रधर शेळके,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे,उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे,औराद कमिटीचे सचिव भरत बियाणी,काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब सौदागर,शिवसेना शहराध्यक्ष सुनील नाईकवाडे,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,व.ब.आघाडीचे महासचिव देवदत्त सूर्यवंशी,टिपू, सुलतान तालुकाध्यक्ष शब्दर कादरी,राष्ट्रवादी नेते विलास माने,काँग्रेस चे सोनाजी कदम,सेवादलचे अफरोज शेख,सय्यद समीउल्ला कादरी,निजाम शेख,सुग्रीव सूर्यवंशी,साहेबराव कांबळे, इ पदाधिकार्याच्या सह्या असून मा.उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर स्व.डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका बचाव कृती समितीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.
