• Wed. Jun 18th, 2025

लातूर जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता भरने सुरू

Byjantaadmin

Jul 26, 2023
लातूर जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता भरने सुरू
लातूर ;- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात वेगवेगळ्या शाखांमधून पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील विविध शाखेतभरणा करीत असून त्यासाठी जिल्हा बँकेने ११५ शाखेत पीक विमा हप्ता भरून घेण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे
पीक विमा हप्ता लवकर भरावा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या नजिकच्या  शाखेत पिक विमा हप्ता लवकर भरून घ्यावा मुदतीच्या आत भरून घ्यावे गर्दी टाळावी  असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *