*यशस्वी सापळा कारवाई*
➡ *युनिट :-* लातूर
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय – 29 वर्षे
➡ *आरोपी :-*
अश्विनी दत्तात्रय जाधव, वय 47 वर्षे, पद- कनिष्ठ लिपिक, दुय्यम निबंधक कार्यालय, निलंगा, जिल्हा- लातूर, रा. आदर्श कॉलनी, लातूर
➡ *तक्रार प्राप्त:-*
दि.24/07/2023
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि.25/07/2023
➡ *लाचेची मागणी रक्कम:-*
आरोपी लोकसेविका यांना e-challan व्यतिरिक्त पैसे मागण्याचा व स्विकरण्याचा अधिकार नसताना *फिस च्या नावाखाली 3,225/- रुपये व वर काय द्यायचे ते द्या..!* असे म्हणून लाचेची मागणी केली.
➡ *स्विकारलेली लाचेची रक्कम:-*
4,500/- रुपये
➡ *हस्तगत लाचेची रक्कम:-*
4,500/- रुपये
➡ *थोडक्यात हकिकत:-*
यातील तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय निलंगा येथे सर्च रिपोर्ट, सूची क्र.2, मूल्यांकन व नकला मिळणे कामी दाखल केलेल्या वेगवेगळ्या अर्जात माहिती व नकला पुरविण्यासाठी आरोपी लोकसेविका जाधव यांना e-challan व्यतिरिक्त पैसे मागण्याचा व स्विकारण्याचा अधिकार नसताना त्यांनी पंचासमक्ष फिस च्या नावाखाली 3,225/- रुपये व वर काय द्यायचे ते द्या..! असे म्हणून लाचेची मागणी केली.
थोड्याच वेळाने आरोपी लोकसेविका जाधव यांना e-challan व्यतिरिक्त पैसे मागण्याचा व स्विकारण्याचा अधिकार नसले बाबत खात्री करून त्यांनी फीस च्या नावाखाली मागणी केलेली लाचेची रक्कम 3,225/- रुपये व वर काय द्यायचे ते द्या..! असे म्हणाल्या प्रमाणे अतिरिक्त 1,275/- रुपये असे एकूण लाचेची रक्कम 4,500/- रुपये आरोपी लोकसेविका जाधव यांना देण्यासाठी त्यांचे दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता आलोसे जाधव यांनी पावती तथा चलन न देता पंचासमक्ष लाचेची रक्कम 4,500/- रुपये स्वतः स्विकारली.
आरोपीस लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. निलंगा पोलीस स्टेशन जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
(मो.नं.09623999944)
➡ *सापळा अधिकारी व पथक :-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक
व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
(मो.नं.09309348184)
➡ *तपास अधिकारी :-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
———————————————
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी – *02382-242674*
@ टोल फ्रि क्रं. 1064