• Thu. Feb 5th, 2026

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा. काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Byjantaadmin

Jul 25, 2023

लातूर : वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. तसेच, झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना मंगळवार दि. 25, 7, 2023 रोजी करण्यात आली. शंखी गोगलगाय, पैसा आळी व इतर कीटकांच्या प्रादुर्भावाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यातच आता कोवळ्या पिकांवर हरण, माकडे, डुक्कर असे वन्य प्राणी ताव मारत आहे. हरणांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहे. वराहाकडुुन ऊस पकाची आतोनात नासाडी केली जात आहे. शेतकऱ्यांवर ही एकामागुन एक संकट कोसळत असल्याने अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे साहेब यांची लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले. यावेळी ही मागणी करण्यात आली.
यावेळी लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, सुनील पडिले, राजकुमार पाटील, अनिल पाटील, सहदेव म्हस्के, संजय खंडापुरकर, आनंद पाटील, पंडित ढमाले, गोविंद डुरे, आनंद पवार, लिंबराज पाटील, बालाजी वाघमारे, बालाजी मनदुमले, परमेश्वर समदरले, गणेश पाटील, पवन देशमुख, विर पांडुरंग, वीर अरुण, ज्ञानोबा गवळे, विपीन गवरे, सिध्देश्वर स्वामी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *