• Thu. Jun 19th, 2025

राज्यात पावसाचा आजपासून पुन्हा जोर

Byjantaadmin

Jul 25, 2023

पुणे : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आज, २५ जुलै ते २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस सक्रिय होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुजरातमधील कच्छ परिसरात हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. प्रामुख्याने किनारपट्टीसह, मुंबई, पश्चिम घाटाचा परिसर, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

Heavy rains in Maharashtra

सांताक्रुजमध्ये १०१ मिमी पावसाची नोंद

सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या मागील २४ तासांत किनारपट्टीवर अलिबाग ४५.८, डहाणू ३७.५, हर्णे ३१.८, कुलाबा ४४.६, सांताक्रुज १०१.५, रत्नागिरी २७.५ मिमी पाऊस झाला. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. विदर्भात पावसाचा जोर कमी होता. अमरावतीत २३.६, वर्धा १४.६ आणि वाशिममध्ये ४९ मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात सोमवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात दिवसभर हलक्या सरी सुरू होत्या. महाबळेश्वरमध्ये ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *