मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजकीय घडामोडींसह केंद्र आणि राज्य सरकारसंबंधित विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आयोगातील लढाई, शिवसेना आमदारांवर अपात्रतेची कारवाई, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरही शिंदे, पवारांनी शहा यांच्यापुढे भूमिका मांडल्याचे कळते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शाह यांच्यासह शिंदे – पवार पुण्यात आहेत. त्याचवेळी शिंदे-पवार यांनीही देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिघांची भेट झाली. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकामधील समावेशानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गटात संघर्ष सुरू झाले आहे. NCP शरद पवार गटाकडूनAJIT PAWAR यांच्या गटावर कारवाई सुरू आहे. तर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. ही लढाई आता केंद्रीय ELECTION COMM. दारात पोचले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर अजित पवार – अमित शाह यांच्या भेटीकडे राजकीय अर्थांनी पाहिले जात आहे.