• Wed. Apr 30th, 2025

लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,जोडे मारो व गाढवावरून ढिंड काढुन आंदोलन….

Byjantaadmin

Nov 8, 2022
लातुर:- खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याच्या निषेधार्थ लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गद्दार वाचाळवीर अब्दुल सत्तार यांचा निषेध करुन त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो व गाढवावरून ढिंड काढुन आणि नंदी स्टॉप येथे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
 
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती व पंरपरेला लाजिरवाणी गोष्ट या राज्यामध्ये घडली.जबाबदार पदावर असतांना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर जावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्या  सुप्रियाताई सुळे यांना शिवी दिली. महाराष्ट्रसाठी व लोकशाहीसाठी अतिशय  लाजीरवाणी गोष्ट आज घडली. या घटनेचा निषेध लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असून यावेळेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.पक्षाच्या वतीने अशा अर्वाच्च शिवीगाळ करणा-या मंत्र्याची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
यावेळी आशाताई भिसे, मुफ्ती फय्याज,व्यंकट बेंद्रे,राजा मणियार,विनोद रणसुभे,किरण बडे,राहुल कांबळे,निशांत वाघमारे,नामदेव जाधव,बरकत शेख, प्रशांत घार,मनिषा कोकणे,मधुमती शिंदे,समीर शेख,विशाल विहीरे, रामभाऊ रायेवार,आर.झेड हाश्मी
टिल्लू शेख,मुन्ना तळेकर,राजेश खटके,इर्शाद सय्यद,जितेंद्र गायकवाड,प्रदिप पाटील,बालाजी चौरे,बाळासाहेब जाधव,अजित शिंदे,बक्तावर बागवान,डी.उमाकांत,आर झेड.हाश्मीपुजा गोरे,साक्षी कांबळे,सोहम गायकवाड बस्वेश्वर,रेकुळगे,जहाँगिर शेख,मयुर जाधव,विवेक पांडे, महेश वाघमारे,उमेश बारकुले,राजू खान,पवन लोंढे,इरफान शेख,कबीर शेख, आमित क्षिरसागर,बाबा कांबळे, आकाश गायकवाड, पाटील मॅडम,सोनकांबळेताई,स्नेहा मोटे, राहुल बनसोडे,आदर्श उपाध्ये,बरकत शेख, सुहास बेंद्रे, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed