महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सत्कार
निलंगा(प्रतिनिधी):- 2006 पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय कार्य करणाऱ्या निलंगा तालुक्यातील महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली. यापूर्वी महादेवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला निलंगा तालुकाध्यक्ष म्हणून 10 वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला लातुर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून 4 वर्ष कार्य केले आहेत .ही निवड राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी केली आहे.मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे महादेवी पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोठे यांनी कामाची दखल घेऊन व लातुर महिला जिल्हा अध्यक्ष मिनाक्षीताई शिगडे यांच्या शिफारसी वरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. याचे औचित्य साधुन निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शाल,श्रीफळ व हार घालुन सत्कार करण्यात आला.यावेळी मसलगे सुधीर -निलंगा विधानसभाध्यक्ष,अंगद जाधव-जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश रोळे किसान सेल,राजकुमार माने ता.प्रसिद्धीप्रमुख,राष्ट्रवादी युवकचे सुग्रीव सुर्यवंशी,तानाजी सुर्यवंशी,व्यंकट माने व तसेच अनेक पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.