निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मणिपूर राज्यामध्ये हिंसाचार व नग्न धिंड प्रकरणाचा जाहीर निषेध व सीबीआय चौकशीची मागणी
निलंगा-निलंगा येथे निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती महोदया यांना उपविभागीय अधिकारी निलंगा मार्फत निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या.अकार्यक्षम संवेदनाहीन मणिपूर सरकार बरखास्त करावे,मणिपूर मधील जाळपोळ हिंसाचार,बलात्कार व हत्या करणार्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे व दोषींवर त्वरित कडक कार्यवाही करण्यात यावी.नग्नधिंड प्रकरणी बलात्कार व्यक्तीसहित त्यांना सहाय्य करणारा जमाव,व मुखदर्शक पोलीस यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी.तेथे शांतता प्रस्थापित करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सम्पूर्ण प्रकरण अतिजलद न्यायालयामार्फत चालवावे.स्थलांतर केलेल्या नागरिकांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी पुनर्वसन करून शांतता प्रस्थापित करावी. या निवेदनावर केंद्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे मणिपूरचे मुख्यमंत्री तर अशा शेकडो घटना घडल्या आहेत असे निर्लज्जपणे सांगत आहेत सदरील दोन महिलेची नग्नधिंड काढणे हे देशाला काळिमा फासणारी घटना आहे व निंदनीय आहे याचा निलंगा तालुका महाविकास आघाडी घटकपक्ष व सामाजिक संघटना जाहीर निषेध करते.अशा पद्धतीचे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना देण्यात आले.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष काँग्रेसडॉक्टर सेलचे डॉ.अरविंद भातांबरे,शिवेसना तालुका प्रमुख अविनाश रेशमे,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ,रिपाई नेते विलास सूर्यवंशी,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, काँग्रेस प्रवक्ते चक्रधर शेळके,काँग्रेस ग्राहक सेलचे तालुकाध्यक्ष भरत बियाणी,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.सेलचे गोविंद सूर्यवंशी,राष्ट्रवादी नेते विलास माने,जि.प.माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरीभाऊ सगरे,राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष धम्मानंद काळे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर,शिवसेना शहराध्यक्ष सुनील नाईकवाडे,निलंगा तालुका काँग्रेस सचिव अबरार देशमुख,व.ब.आ.महासचिव देवदत्त सूर्यवंशी,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष मुन्नाबी मोबिन,राष्ट्रवादीचे अलिबाबा चौधरी,अंगद जाधव,सुग्रीव सूर्यवंशी,संगीत कदम,अफरोज तीलगुरे,सय्यद समीउल्ला कादरी,टिपू सुलतान चे तालुकाध्यक्ष शब्दर कादरी इ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या होत्या.