• Thu. Jun 19th, 2025

महाराष्ट्र संघातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या दोन खेळाडूंना कांस्य पदक मिळाल्याबद्दलल त्यांचा सत्कार

Byjantaadmin

Jul 24, 2023

महाराष्ट्र संघातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या दोन खेळाडूंना कांस्य पदक मिळाल्याबद्दलल त्यांचा सत्कार

लातूर :-तामिळनाडूच्या नामाक्‍कल जिल्ह्यातील त्रिचेमगोडे येथे 21 ते 23 जुलै दरम्यान झालेल्या 24 व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्रातील 17 वर्ष वयोगटातील जेएसपीएमच्या मुलींच्या संघाने देशात तिसरा क्रमांक मिळाला असून यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयातील सिध्दी मेंगले व मधुरा सांगवीकर या दोन खेळाडूंनी कांस्यपदक मिळविलेले आहे.
महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून कांस्यपदक मिळविलेल्या या दोन्ही विद्यार्थीनींना संघ प्रशिक्षक सय्यद सर, बालासाहेब शेप, विनायक टेकाळे यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील,समन्वयक विनोद जाधव, समन्वयक बापूसाहेब गोरे,प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारूती सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, अनिल सोमवंशी, अकॅडमीक हेड सरदार शेख, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *