• Fri. Jun 20th, 2025

मार्केटयार्डातील सर्व घटकांची वरुण राजासाठी अविरत सेवा कौतुकास्पद-राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Jul 23, 2023

मार्केटयार्डातील सर्व घटकांची वरुण राजासाठी अविरत सेवा कौतुकास्पद-राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

लातूर :-जगाचा पोशिंदा शेतकरी राजासाठी वरुणराजाचे आगमन व्हावे चांगला पाऊस पडावा शेतकरी सुखी रहावा यासाठी मार्केट यार्डातील सर्व घटकांच्या वतीने अविरत २९ वर्षापासून सुरू असलेल्या सार्वजनिक सत्यनारायण महापूजा भंडारा चे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यार्डातील सर्व घटकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक सत्यनारायण महापूजा भंडारा चे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले कार्याला शुभेच्छा दिल्या

तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले महाप्रसाद घेतला यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मार्केट यार्ड सार्वजनिक सत्यनारायण महापूजा भंडारा समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

कार्यक्रमास राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनिल पडीले, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे उपाध्यक्ष शाम भोसले, गणेश एस आर देशमुख, विजयकुमार साबदे, अशोक अग्रवाल, पंडित कावळे रमेश सुर्यवंशी, सचिन दाताळ, बाजार समितीचे सर्व संचालक आडते व्यापारी, हमाल मापाडी,गुमस्ता, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *