शंभर टक्के शासकीय योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्या
मागणी अर्ज एकही शिल्लक राहता कामा नये आ.निलंगेकर यानी केल्या अधिकाऱ्यांना सुचना
निलंगा/प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनेच्या मागणी अर्जाची तात्काळ पुर्तता करून लाभार्थांना शंभर टक्के लाभ द्यावे,यात हलगर्जी खपवून घेणार नाही अशी सुचना माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी शासन आपल्या दारी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.
निलंगा तहसिल कार्यालयात माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची निलंगा,देवणी शिरूर अनंतपाळ विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर ,अपविभागीय अधिकारी शोभा जाधव,तहसिलदार उषाकिरण शृंगारे,प.स.गटविकास अधिकारी सोपान अकेले,उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटेकर,यांच्या सह सर्वच शासकीय कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की शासन आपल्या दारी ही योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यानी सक्षमपणे राबवण्यासाठी पाऊल उचलले असून यात एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशी वरीष्ठ स्तरावून सुचना केल्या आहेत.याची आपण तंतोतंत आमलबजावनी करावी व शासनाच्या विविध विभागात येणारे मागणीचे अर्ज तात्काळ निकाली काढून लाभाची पूर्तता करावी यात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशी अशा सुचना आमदार निलंगेकर यानी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासन आपल्या दारी याची पूर्ण तयारी प्रत्येक विभागाने करा शासकीय योजने अंतर्गत येणारे कृषी विभाग,विद्युत महावितरण,संगायो,आरोग्य विभाग,पंचायत समिती अंतर्गत येणारी रमई,पंतप्रधान आवास योजना,ठक्कर बप्पा योजना,असेल किंवा कृषी प.स.व कृषी कार्यावायातील शेतकऱ्यांना मिळणारे अनुदन तत्वावर ट्रॕक्टर,कृषी पंप,सोलार,स्पींकलर,पाईपलाईन अनुदान,मोटार,फळबाग,शेळी गट,दुधाळ गट,गोठा,कुकुट पालन यासह अनेक शासकीय योजनेचे अर्ज शासन आपल्या दारी या योजनेतून येत्या २५ ते ३० जूलै पर्यत स्वीकारून येणाऱ्या १५ आॕगस्ट पर्यंत शंभर टक्के निकाली काढावे व शंभर टक्के लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा अशी तरतूद करावी एकही अर्ज केलेला लाभार्थी वंचित राहणार नाही याचे सुक्ष्म नियोजन अधिकारी कर्मचारी यानी करावे लाभिर्थ्यांच्या तक्रारी आल्या तर गय केली जाणार नाही अशा सुचना निलंगा विधान सभेचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी शासन आपल्या दारी या आढावा बैठकीत उपस्थित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
या बैठकीला शेषराव ममाळे,मनोज कोळ्ळे,सरपंच स्वरूप धुमाळ,मनोज पवार,बंकट बिराजदार,तम्मा माडीबोने,अप्पाराव सोळुंके,महसुलचे नायब तहसिलदार, तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी,प.स.अंतर्गत सर्वच विभागाचे कर्मचारी,पशु वैद्यकीय अधिकारी,अदी उपस्थित होते.