देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी असतो. दोघेही राज्याचे सध्याचे DCM आहेत. दोन्ही नेते खूप हुशार आणि राजकारणावर दोघांचीही चांगली पकड आहे. दोघांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत जवळपास सारखी आहे. दोन्ही नेते उपमुख्यमंत्रिपदावर असून या दोघांची मैत्री सुद्धा खास आहे. जाणून घेऊयात या दोघांबाबत….
राज्याच्या राजकारणात भूकंप
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पहाटेच्या या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप आला होता. हे सरकार अडीच दिवसच टिकलं मात्र, या शपथविधीने सर्वांनाच धक्का दिला होता.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. मात्र, दोघांच्या वयात अंतर आहे. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांपेक्षा वयाने मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजप कार्यकर्त्यापासून केली आणि 2014 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. तर अजित पवार हे सर्वप्रथम विधानसभा नाही तर लोकसभेवर निवडून गेले होते. 1991 मध्ये अजित पवार बारामती लोकसभेच्या जागेवर निवडून गेले. पण शरद पवारांसाठी त्यांनी आपली खासदारकी सोडली होती. त्यानंतर अजित पवार हे विधानसभेवर निवडून येत आहेत.
