• Fri. Jun 20th, 2025

कुरूलकरांची ‘व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनलिसिस टेस्ट’; तपासाला मिळणार योग्य दिशा

Byjantaadmin

Jul 22, 2023

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुरुलकर यांच्या ‘व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनलिसिस टेस्ट’ करण्यासाठी शुक्रवारी सरकारच्या वतीने न्यायालयात परवानगी मिळवण्यासाठी लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्या ‘व्हॉईस लेअर सायकॉलॉजिकल टेस्ट’संबंधी दाखल याचिकेवर आता २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन प्रदीप कुरुलकर अटकेत आहे. आता त्यांच्या ‘व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनलिसिस टेस्ट’ करण्याची सरकारने तयारी सुरू केलेली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चाचणीला परवानगी मिळावी, असे ॲड. फरगडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या लेखी युक्तीवादात म्हटले आहे.

Pradip Kurulkar

‘व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल ॲनलिसिस’साठी कुरुलकरांच्या संमतीची गरज नाही. मात्र चाचणीसाठी आवश्यक ती परवानगी मिळण्याची आवश्यकता आहे. कुरुलकरांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलेली कागदपत्रे अद्याप मिळालेली नाही. त्यातील बरेच जबाब ‘सील’ आहेत. त्यामुळे जबाबात नेमके काय आहे, याबाबतची माहिती मिळाल्यास युक्तीवाद करणे सोपे होईल, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलेले आहे.कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुरुलकर यांच्याबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहेत. त्यांनी दोन महिलांवर ‘डीआरडीओ’च्या कार्यालयात अत्याचार केल्याचीही यापूर्वी समोर आले आहे. ‘एटीएस’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *