माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मान्यवरांनी घेतल्या सदिच्छा भेटी
लातूर दि. २१.राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांची शुक्रवारी आशियाना बंगल्यावर जिल्ह्यांतील विवीध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह माजी आमदार वैजनाथजी शिंदे, माजी आमदार अँड त्रिंबकजी भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील,रेना चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील आदी मान्यवराणी सदिच्छा भेटी घेतल्या तसेच विविध विषयांवर चर्चा केली
यावेळी लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे उपाध्यक्ष शाम भोसले , मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, संचालक अशोकराव काळे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख,इंदिरा सूतगिरणी चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा मजूर संघाचे माजी चेअरमन जगन्नाथ पाटील, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, बाजार समितीचे संचालक वाघमारे, शहर जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, शशिकांत कदम, शिवाजी कांबळे, सतीश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते