निलंगा:-निलंगा नगरपरिषद कायम कर्मचारी सेवकांची सहकारी पतसंस्था ची 41वी सर्वसाधारण सभा दिनांक 06 /11 /2022 रोजी कै.डॉ. शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद निलंगा येथे संपन्न झाली या सभेला निलंगा नगर परिषदेमधील सर्व कर्मचारी बंधू भगिनी तसेच सभासद सदस्य व संचालक उपस्थित होते. सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले त्या बद्दल सर्व कर्मचारी वर्गानी समाधान व्यक्त केले. तसेच नूतन संचालक मंडळाचे पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेच्या या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सभासद संचालक मंडळ व कर्मचारी या सर्वांचे पतसंस्थेचे चेअरमन श्री प्रेमनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्यामुळे या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले या कार्यक्रमास पतसंस्थेचे सचिव रमेश कांबळे व्हाईस चेअरमन जाफर अन्सारी तसेच संचालक मंडळातील विक्रम शिंदे ,गोपाळ सोळुंके, सुमनबाई सुरवसे, लक्ष्मीबाई कांबळे, सौ .कौडगावे अरुणा ,सचिन कांबळे हे उपस्थित होते .तसेच निलंगा नगर परिषदेचे कर्मचारी विकास पवार, संदीप निटुरे ,दिलीप लोंढे, दत्ता सुरवसे, ज्ञानोबा गायकवाड, कृष्णा कांबळे ,महादेव कांबळे, इत्यादी कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री भंडे उपस्थित होते. सदरील सर्वसाधारण सभेला मोठ्या प्रमाणात कर्मचारी व सभासद उपस्थित होते सर्वसाधारण सभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.