• Tue. Apr 29th, 2025

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल

Byjantaadmin

Nov 7, 2022

नांदेड, 7 नोव्हेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अखेर आज महाराष्ट्रात दाखल दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. त्यानंतर पुढील 14 दिवस ही यात्रा राज्यात ठिकठिकाणी जाणार आहे.

यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील. देगलूर येथील शिवाजी चौकातून 50 हजार कार्यकर्त्यांच्या जनसमुदायासह हातात मशाल घेऊन राहुल गांधी पुढे मार्गक्रमण करतील. ते गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा इथे जाणार आहेत.

नांदेडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या भोजनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेले खाद्यपदार्थ या भोजनात असतील. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत या पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश असेल, अशी माहिती संबंधितांनी दिली.

या यात्रेसाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहे. तर शिवसेनेकडून अद्याप कोण या यात्रेत सहभागी होणार हे अद्याप ठरलेलं नाही.

संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी नांदेडमध्ये

आज रात्री राहुल गांधी देगलूर वन्नाळी मशाल यात्रा

पूजाअर्चा करुन परत देगलूरला येणार

यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम

28 पदाधिकारी मदतीसाठी नियुक्त

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed