राजा नारायणलालजी लाहोटी यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमित्याने ६५ जणांनी केले रक्तदान
लातूर लातूरचे दानशूर तथा मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष राजा नारायणलाल लाहोटी यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमीत्ताने लाहोटी कॅम्पस येथे बुधवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात लाहोटी परीवार,त्यांचे स्नेही मित्र यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला तब्बल ६५ जणांनी रक्तदान करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे तत्पूर्वी राजा नारायणलाल लाहोटी साहेब यांच्या प्रतिमेला लाहोटी परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलेदिवंगत राजा नारायणलालजी लाहोटी यांनी लातूरच्या समाजकारण, शैक्षणीक, धार्मिक, राजकारणात,सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अनेकांना मदत करण्याची भूमिका या परिवाराने त्या काळात केलेली आहे आता तोच वारसा पूढे लक्ष्मीरमणजी लाहोटी व त्यांचा परिवार चालवत आहेरक्तदान शिबिरासाठी डॉ भालचंद्र ब्लड बँकेचे डॉ गजभारकर, दिगंबर पवार, किशोर पवार,अरुण कासले, सौ सुरेखा हजारे, संजय ठाकूर, अन्नार शेख यांनी परिश्रम घेतले.
लातूरचे दानशूर तथा मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजा नारायणलालजी लाहोटी यांच्या ३० व्या पुण्यतीथि निमित्ताने लाहोटी परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यावेळी लक्ष्मीरमनजी लाहोटी विशाल लाहोटी लाहोटी परिवारातील सदस्य उपस्थित होते