• Tue. Apr 29th, 2025

नवणीत राणांच्या अडचणीत वाढ:बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

Byjantaadmin

Sep 24, 2022

अमरातवीच्या खासदार नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी मुंबईतील शिवडी महागनर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

नवणीत राणा यांच्याह त्यांचे वडील हरभजन सिंह यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे महागनर दंडाधिकारी न्यायालयाकडून आतापर्यंत दोनवेळा नवनीत राणा व त्यांच्या वडीलांविरोदात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शाळा सोडल्याच्या बनावट दाखल्यावरुन नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. तसेच, नवनीत राणांच्या वडिलांनी फसवणूक करुन हे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप आहे. या प्रकरणी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनीत राणा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून अमरावतीमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आपण अनुसूचित जातीच्या असून हे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. मात्र, नवनीत राणा व त्यांच्या वडिलांनी खोट्या दाखल्याच्या आधारावर हे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मागील महिन्यातच राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, आता पुन्हा दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed