• Sun. Jun 22nd, 2025

पटोले-चव्हाणांपाठोपाठ ‘विरोधी’ खुर्चीसाठी वडेट्टीवार, केदार, ठाकूर सरसावल्या !

Byjantaadmin

Jul 18, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारमधील समावेशानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. या पदावर आता काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात येत आहे. या पदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत असतानाच माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांच्याही नावांची भर पडली आहे. या खुर्चीसाठी काँग्रेसमधल्या अर्ध्या डझन नेत्यांची स्पर्धा रंगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस संख्याबळानुसार सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे काँग्रेसने या पदावर दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीसाठी आता काँग्रेसकडून अर्धा डझन नावे पुढे येत आहेत. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या स्पर्धेमध्ये आता दुसऱ्या फळीतील नेतेही उतरले आहेत. यामुळे विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसमध्येच मोठी चुरस असल्याचे झाल्याचे दिसून येत आहे.

सत्ताधाऱ्यांशी सामना करायचा असेल तर विरोधीपक्ष नेतेपदासाठी प्रबळ आणि आक्रमक चेहरा असावा, अशी भूमिका काँग्रेसची आहे. VIJAY WADTIWAR यांचे नाव या स्पर्धेत पुढे आहे. यापूर्वी ते विरोधी पक्षनते राहिले आहेत. त्यांना या पदासाठी कार्यकाळ मिळाला होता. विरोधीपक्षनेते पदासाठी नाव दिले जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र काँग्रेसने अजूनही नाव दिलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *