• Mon. Jun 23rd, 2025

सत्ताधारी विरोधकांच्या गदारोळातही राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध; एस. जयशंकर यांच्यासह ‘या’ नेत्यांची निवड

Byjantaadmin

Jul 17, 2023

राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आल्या आहेत.WB सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतही मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.राज्यसभेसाठी 24 जुलैला मतदान होणार होते. 11 जागांपैकीTM सहा आणि भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यासह राज्यसभेत भाजपाची एक जागा वाढली आहे. आता राज्यसभेत भाजपाचे 93 खासदार झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथील अनंत महाराज BJP उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले आहेत.

S. Jaishankar, Derek O'Brien, Dola Sen News

टीएमसीचे डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॉय आणि डोला सेन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. याशिवाय साकेत गोखेल, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बडाइक हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले आहेत. आता CONGRESS राज्यसभेतील एक जागा कमी झाली आहे. त्याचवेळी भाजपाच्या एका जागेत वाढ झाली आहे.राज्यसभेमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून 105 खासदार झाले आहेत. भाजपाला पाच नामनिर्देशित आणि दोन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळणार हेही निश्चित आहे. अशा प्रकारे सरकारच्या बाजूने 112 खासदार आहेत, तरीही भाजपाला बहुमतासाठी 11 सदस्य कमी आहेत. सरकारला बहुजन समाज पक्ष, जेडीएस आणि टीडीपीच्या प्रत्येकी एका खासदाराच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.त्याचवेळी केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या विरोधात आणलेल्या अध्यादेशाला 105 पक्ष विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत सरकारला बीजेडी आणि वायएसआरसीपीची मदत लागेल. या दोन्ही पक्षांचे 9-9 खासदार आहेत. विधेयक चर्चेसाठी आणि मतदानासाठी आल्यावर सभागृहातच याबाबत निर्णय घेणार असल्याचे बीजेडीने म्हटले आहे. तर वायएसआरसीपीने अद्याप त्यांचे पत्ते उघडलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *